पावसाळ्याच्या दिवसात मसाले खराब होण्याची शक्यता जास्त असते
अशावेळी पावसाळा सुरू झाला की गृहिणींची धावपळ आणि चिंता वाढते
दमट हवामानामुळं मसाले खराब होण्याची शक्यता वाढते. ही पद्धत वापरुन तुम्ही मसाले स्टोअर करु शकतात
पावसात मसाल्यांना ओलसरपणा येतो त्यामुळं ते खराब होतात. तसंच, त्यात किडे पडण्याचीही शक्यता असते
मसाले ठेवण्यासाठी एअर टाइट कंटेनरचा वापर करा. त्यामुळं मसाले ओलसर होण्याचा धोका कमी होतो
मसाल्यांचे डब्बे ठेवण्यासाठी अशी जागा शोधा जिथे थोडं सुद्धा पाणी येणार नाही
मसाले एअर टाइम डब्ब्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता
खडे मसाले लवकर खराब होत नाहीत त्यामुळं बाजारातून खडे मसाले घ्या
आवश्यकतेनुसार खडे मसाले मिक्सरमध्ये वाटून बारीक करुन घ्या. पावडर मसाल्यांच्या तुलनेने ते जास्त टिकतात
मसाले ठेवण्यासाठी गडद रंगाची बरणी निवडा. जेणेकरुन त्याच्यावर सहज प्रकाश पडणार नाही