मासांहरी आणि शाकाहरी अशा दोन्ही जेवणात प्रामुख्याने खोबरं वापरलं जातं
स्वयंपाकघरात गृहिणी आधीच सुख्या खोबऱ्याची साठवण करुन ठेवतात
मात्र, काही वेळेला साठवण केलेल खोबरेदेखील खवट आणि काळे पडते
खवट आणि काळे पडलेले खोबरे चवीलाही चांगले लागत नाही. अशावेळी खोबरं कसं स्टोअर करावं असा प्रश्न पडतो.
सुकं खोबरं महिनोंमहिने कसे टिकवून ठेवायचे याच्या काही टिप्स
खोबरे एका पिशवीत बांधून हवाबंद डब्यात ठेवून द्यावे. खोबऱ्याला पाणी लागणार नाही याची खालजी घ्या
डब्यात भरुन ठेवण्याआधी खोबरं एका कागदावर पसरवा. त्यानंतर एका वाटीत पाणी घेऊन त्यात मीठ टाका
एक नॅपकिन मीठ पाण्यात बुडवून खोबऱ्याची वाटी आतून-बाहेरुन पुसून घ्या. त्यानंतर खोबरं नीट सुकवून घ्या
खोबरं सुकवल्यानंतर एका कपमध्ये थोडं तेल घ्या आणि हाताने खोबऱ्याच्या वाटीला आतून बाहेरुन लावून घ्या
तेल लावलेल्या सर्व खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात दोन दिवस वाळवून घ्या मगच हवाबंद डब्यात ठेवा