बदाम खाणे मेंदूसाठी आणि शरीरासाठीही फायदेशीर असते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते तसंच, रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. पण दिवसाला बदाम कसे व किती प्रमाणात खावे, हे अनेकांना माहिती नसते.
लहान मुलांना रोज बदाम खायला दिल्यास त्यांचा बौद्धिक विकास होतो. त्याचबरोबर हाडे आणि दातांना बळकटी येते. बदामामध्ये ग्लाइसेमिक लोड झिरो असतो. त्यामुळं पचनसंस्था मजबूत होते.
एका अहवालानुसार स्वस्थ आणि निरोगी व्यक्तीने दिवसभरात एक मुठ बदाम खावेत. म्हणजेच जवळपास 56 ग्रॅम बदाम तुम्ही एका दिवसात खाऊ शकता. तर, 4 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना दिवसातून 3-4 बदाम भिजवून देऊ शकता.
कार्बोहायड्रेटयुक्त जेवण करण्याऐवजी 40 ग्रॅम बदाम खा. त्यामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल. त्याचबरोबर पोटाची चरबीदेखील कमी होईल.
जर तुम्ही दोन्ही वेळच्या जेवणाच्या मधल्या वेळेत बदाम खाल्लास तुमचं पोट भरल्यासारखे राहिल. तसंत, भुकेवरही नियंत्रण राहते आणि तुम्ही फिट आणि हेल्दीही राहता.
बदाम तुम्ही दिवसभरातून कधीही खाऊ शकता. पण सकाळी अनोशापोटी जर तुम्ही बदाम खाल्ल्येत तर शरीराला त्याचा फायदा होईल.
बदाम गरम असतात त्यामुळं ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच उन्हाळ्यात व पावसाळ्यात भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. तर हिवाळ्यात कच्चे बदाम खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते.
बदाम खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. त्यात व्हिटॅमिन आणि मॅग्शीशियम असतात. त्यामुळं थकवा दूर होतो.
बदामामध्ये न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. त्याचबरोबर प्रोटीन आणि आर्यरनची मात्राही जास्त असते.