चिया सीड्स खायला चवदार आणि आरोग्यदायी असतात. आणि त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात.
चिया सीड्समध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आढळतात.
चिया बियांपासून आरोग्यदायी आणि चविष्ट असे वेगवेगळे डिशेस बनवल्या जातात.
चिया सीड्स, दूध आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून पुडिंग बनवले जाते.
दही, चिया सीड्स, काकडी आणि मसाले टाकून रायताही बनवू शकतो.
गव्हाचे पीठ आणि चिया सीड्सची पावडर एकत्रित मिक्स करून चपाती करु शकतो
चिया सीड्सपासून बिस्किटे स्नॅक म्हणून आहारात खाऊ शकता.
चिया सीड्स, दूध आणि ड्रायफ्रूट्स घालून पौष्टिक लाडू बनवू शकता.
चिया सीड्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)