सकाळी उठताच खावा 'ही' 4 फळं; थकवा जवळपासही भरकटणार नाही

शरीराला योग्य पोषणतत्वं मिळावीत यासाठी फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

पण अशी काही फळं आहेत जी सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास तुम्हाला एनर्जी मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कलिंगड खाऊ शकता. हे हायड्रेटिंग फळ आहे.

कलिंगडात लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडेंट असतं जे तुमचं ह्रदय आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

अननसाचं सेवन करणही शरीराला फायदेशीर आहे. यातील विटॅमिन ए आणि मॅग्नीज तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात.

सकाळी सफरचंद खाणंही फायदेशीर आहे. यातील क्वेरसेटिन सारखे अँटीऑक्सिडेंट तुमच्या मेंदूसाठी फायद्याचे असतात.

तुम्ही सकाळी किवीही खाऊ शकता. हे फळ तुमची प्रतिकारशक्ती वाढवतं, तसंच पचनयंत्रणा सुधारतं.

हे फळ किडनी, आतड्या आणि ह्रदयासाठी फायदेशीर असतं.

VIEW ALL

Read Next Story