आरोग्यास पूरक अशी भरपूर फळं खा. पण, ती खाताना आणि खाल्ल्यानंतरही काळजी घ्यायला विसरु नका.
डाळींब- लोह असणारं डाळींब खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास त्यामुळं पोटदुखीचा त्रास उदभवतो. त्यामुळं ही चूक करू नका.
पेरु- पेरू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यानं पचनक्रीया बिघडते. त्यामुळं चुकूनही पाणी पिऊ नये.
नाशपाती- नाशपाती खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. नाहीतर तुम्हाला सर्दी आणि खोकला होऊ शकतो.
केळं- केळं खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास त्यामुळं थेट पचनसंस्थेवर याचे परिणाम होतात.
सफरचंद- तुम्हाला माहितीये का सफरचंद खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे.