आल्यामुळे बॉडी मध्ये हिट निर्माण होते त्यामुळे आलं हे ठंडीत खुप उपयोगी ठरतं . खुप लोकं पावसाळा आणि ठंडी मध्ये आल्याचा चहाचं सेवन करतात.
आल्यामध्ये अॅंटिऑक्सिडेंट्स आणि बायोअॅक्टिव कंपाऊंड्स ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्या सारख्या आजारांपासून वाचतो.
आल्यामध्ये बॉडी गरम ठेवण्यासाठी लागणारे घटक आहेत ज्यामुळे श्वासनासंबंधित त्रास दुर होतात.
आल्यामध्ये अॅंटिईंफ्लेमेंट्री घटक असतात ज्यामुळे हिवाळ्यात सांधेदुखी सारखा आजार होत आसेल तर तो कमी होतो.
दररोज जेवणाआधी आल्याच्या तुकड्याला मीठ लावून खाल्ल्याने भूक चांगली लागते आणि तोंडाला चवसुद्धा चांगली येते.
आलं खाल्ल्याने गॅसेस , अॅसिडीटी , अपचन यासारखे पोटाचे आजार कमी होतात.
पित्ताचा त्रास होत असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, एक चमचा पुदिन्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून चाटण तयार करावं. हे चाटण दिवसातून 3 वेळा खावं.
कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी आलं खाण फायदेशीर ठरतं. आलं खाल्ल्याने रक्तात गुठल्या होच नाहीत. रक्तप्रवाह सुधारतो.