तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडतात का ? जाणून घ्या त्यांचे अर्थ

काही प्रकारची स्वप्ने सर्वसाधारणपणे सर्वांनाच पडतात . या स्वप्नात तुम्ही एखादी विशिष्ट कृती करत असता. अशी स्वप्ने उगाचच दिसत नाहीत, तर त्यांमागे काही अर्थ असतात . प्रत्येक विशिष्ट कृती विशिष्ट कारणामुळे घडताना दिसते.

पडणे

कधी कधी स्वप्नात आपण स्वतःला सतत पडताना बघतो . अशी स्वप्ने तुम्हाला असुरतक्षितता जाणवत असल्याने पडतात . तुम्ही जर अशी स्वप्ने बघताय तर तुम्हाला अपयशाची भीती वाटत आहे.

पाठलाग

तुम्हाला असे वाटते की कोणीतरी सतत पाठलाग करत आहे . तर या स्वप्नाचा अर्थ भावनांमध्ये लपलेला आहे . तुम्ही भावनांपासून लांब पळायचा प्रयत्न करत आहात . आणि जो कोणी पाठलाग करतोय तो माणूस नसुन तुमच्या समस्या आहेत .

दात पडणे

लोकांना फारच विचित्र स्वप्न पडते ज्यात त्यांना दात पडताना दिसतात . अशी स्वप्ने एखादी परिस्थिती हाता बाहेर जाऊ लागल्यास पडतात. तुम्ही कशाची तरी चिंता करत आहात असा याचा अर्थ आहे .

बुडणे

जवळपास सगळ्यांनाच हे स्वप्न कधीनाकधी पडते . तुमचा जीव गुदम्हरत असल्यास तुम्हाला बुडायची स्वप्ने पडतात . अतिभावूक , ताणतणावजन्य परिस्थितीत असलेल्या लोकांना अशी स्वप्ने पडतात .

नग्न अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी जाणे

लोकांना बरेचदा असे स्वप्न दिसते की ते नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत आहेत आणि त्यांना कपडे मिळतच नाहीयेत .जर तुम्हाला कसली तरी लाज वाटत असेल असुरतक्षित वाटत असेल , लोकं काय म्हणतील अशी भीती वाटत असेल तर असं स्वप्न पडतं .

उशीर होणे

तुम्हाला कुठेतरी जायचे आहे पण उशीर होतोय अशा प्रकारची स्वप्ने जर पडत असतील तर तुम्हाला आयुष्यात संधी गमावण्याची भिती वाटते आहे. आणि तुम्ही नविन आव्हानांसाठी तयार नाही असा याचा अर्थ आहे .

प्रेमाची माणसे गमावणे

या प्रकारच्या स्वप्नात खऱ्या आयुष्यातील अडचणी नसतात . तुम्हाला कोणाला तरी गमवायची भीती वाटत आहे किंवा तुमच्या नात्यांमध्ये काहीतरी खटकत आहे असा या स्वप्नाचा अर्थ आहे .

अडकल्यासारखे वाटणे

कामाच्या ठिकाणी , नात्यात किंवा अन्य ठिकाणी जर तुम्ही आनंदी नसाल तर अशी स्वप्नं पडतात . याचा अर्थ तुम्हाला मार्ग काढायची गरज आहे असा होतो.

VIEW ALL

Read Next Story