Haemorrhoids : पाईल्सच्या रूग्णांनी आहारात चुकुनही 'या' गोष्टींचा समावेश करू नये

पाईल्स हा शरीरातील गुदाशय आणि गुदद्वार या भागातील रक्तवाहिन्यांच्या आजाराचा एक प्रकार असतो.

यामध्ये गुदद्वाराच्या आतील आणि बाहेरील रक्तवाहिन्यांना सूज येते. यामुळे वेदनादेखील होतात आणि काहीवेळा रक्तस्त्राव देखील होतो.

पाईल्सचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते यासाठी रूग्णाने खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया

पाईल्सचा त्रास असलेल्या रूग्णांना हिरवी किंवा लाल मिरची खाणं टाळावं. कारण यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

पाईल्सच्या रुग्णांसाठी व्यसन धोकादायक ठरू शकते. सुपारी, गुटखा, पान मसाला यांचं सेवन टाळालं पाहिजे.

पाईल्सचा त्रास असलेल्या रुग्णांनी बाहेरील खाद्यपदार्थापासूनही दूर रहावं. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या अन्नात मसाला आणि तेलाचं प्रमाण अधिक असतं.

पाईल्सचा त्रास असलेल्या रूग्णांनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात, कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि पोषक घटक असतात.

VIEW ALL

Read Next Story