हिरवी मिरचीचे फायदे

हिरवी मिरची ही आरोग्या अत्यंत फायदेशिर असते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सीडेंट्सचे प्रमाण देखील जास्त असते. जाणून घेऊयात हिरवी मिरचीचे फायदे...

आरोग्यासाठी किती फायदेशीर असते?

चवीला तिखट लागणारी मिरची आरोग्यासाठी किती फायदेशीर असते? आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत...

पचन सुधारते

हिरवी मिरची अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, हिरव्या मिरचीमध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

रक्ताभिसरण सुधारते

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते ज्यामुळे ती तिखट लागते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण संतुलित राहते.

सांधेदुखीमध्ये फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात आणि ऑस्टियोआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी याचा वापर खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हाडांची सूज आणि वेदना कमी होतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे वृद्धत्वापासून संरक्षण करते आणि मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करते.

लोहाची कमतरता दूर करते

हिरव्या मिरचीमध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांना थकवा जाणवतो. अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करावा.

त्वचेसाठी फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेला अधिक कोलेजन तयार करण्यास मदत करते. हिरवी मिरची त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यात मदत करते.

हाय बीपी

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, म्हणूनच ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. याबरोबरच मिरचीतील सायट्रिक अॅसिड रक्त पातळ करण्याचे काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित राहते.

डायबिटीज लेव्हल कंट्रोलमध्ये

जर तुम्हाला डायबिटीज लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज हिरव्या मिरच्या खाव्यात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story