वर्षभर येणार फळ म्हणजे केळ. केळ्यात पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यासोबत व्हिटॅमिन बी 6, सी, ए देखील असतात. तुमच्या मुलांना नक्कीच केळी खाण्याचा सल्ला द्या. (All Photo Credit : Pexels) . (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
मास्यांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड खूप असते. रिपोर्ट्सनुसार, ओमेगा -3 फॅटी ऍसिड मुलांची उंची वाढवण्यास महत्त्वाची ठरू शकतात.
मुलांनी जमेल तितकी फळं खायला हवी. फळांमध्ये त्यांची उंची वाढवण्यात फळांचा महत्त्वाचा वाटा असू शकतो, कारण त्यांच्यात व्हिटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.
दूध पिल्यानं आपल्याला अनेक पोषक तत्त्वे मिळतात. यात कॅल्शियम आणि प्रोटीन असते त्यामुळे हाडं मजबूत होतात.
सोयाबीनमध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात. सोयाबीन खाल्यानं हाडं मजबूत होतात. त्यामुळे मुलांची उंची वाढण्यास नक्कीच फायदा होतो.
अंडीत प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. तुम्ही तुमच्या मुलांना सकाळच्या नाश्त्यात उकडलेलं अंड खायला द्यायला हवे. अंड्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.
बऱ्याच मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाही. पण हिरव्या भाज्यांमध्ये आयरन, मॅग्नीशियम, फाइबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, आणि व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते.