Eye Flu

डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!

Jul 30,2023

खाण्यापिण्याकडे लक्ष देणं

आजारापणात खाण्यापिण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. कारण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो.

डोळ्याचे आरोग्यावर वाईट परिणाम

सध्या देशात आय फ्लूने थैमान घातला असून तुम्ही खात असलेले पदार्थांमुळेही डोळ्याचे आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो.

मसालेदार आणि गरम अन्न

या पदार्थ्यांनी डोळ्यांमध्ये जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते. विशेषत: जर तुम्ही त्यांना स्पर्श केल्यानंतर तुमच्या डोळ्यांना स्पर्श केला तर तु्म्हाला इन्फेक्शन होतं.

खारट पदार्थ

सोडियमचं प्रमाण आहारात वाढलं तर डोळ्याभोवती पाणी साचून सूज येत. ज्यामुळे संसर्ग वाढू शकतो.

लिंबूवर्गीय फळं

संत्री, लिंबू आणि द्राक्षं यांसारखी लिंबूवर्गीय फळं आम्लयुक्त असतात. यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

दुग्धजन्य पदार्थ

पाश्चराइज्ड दुधात हानिकारक जीवाणू असतात. ज्यामुळे डोळ्यांचं संक्रमण वाढू शकतं.

तळलेले आणि स्निग्ध पदार्थ

जास्त चरबीयुक्त पदार्थाचं सेवन केल्यामुळे जळजळ होते. हे पदार्थ डोळ्यांच्या संसर्गाच्या वेळी योग्य नसतात.

प्रक्रिया केलेले आणि पॅकेज फूड

यामध्ये अनेकदा प्रिझर्वेटिव्ह आणि अॅडिटीव्ह असतात, जे संसर्गाच्या वेळी तुमच्या डोळ्यांसाठी चांगले नसतात.

अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पेये

अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पेये निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतात. ज्यामुळे संपूर्ण उपचार प्रक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होतो.

ऍलर्जीयुक्त पदार्थ

तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असल्यास, ते विशिष्ट पदार्थ टाळा कारण ते डोळ्यांच्या संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story