अनेकदा अति तणावामुळे, वृद्धत्वाची लक्षणे अगदी लहान वयात दिसू लागतात. म्हणून आपण कमी ताण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान यासारख्या तंत्रांचा वापर करू शकता.
जर तुम्हाला केस पांढरे होणे टाळायची असेल तर तुम्ही धूम्रपान पूर्णपणे बंद केले पाहिजे. याशिवाय, तुम्हाला तुमच्या कॅफिनच्या सेवनावर मर्यादा घालावी लागेल.
कॉपर आणि व्हिटॅमिन बी 12 सारख्या जीवनसत्त्वांचे सेवन केल्याने तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. याच्या सेवनाने पांढरी दाढी सारखी समस्या भविष्यात दिसणार नाही.
कढीपत्त्याचे पाणी केस काळे होण्यास खूप मदत करते. कढीपत्ता थोड्या पाण्यात उकळवा. नंतर हे पाणी थंड करून गाळून प्या. असे नियमित केल्यास फायदा होईल.
अर्धी वाटी कच्ची पपई बारीक करून त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा कोरफडीचा रस घाला. त्यानंतर ते दाढीवर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर ते धुवून काढा.
जर तुम्हाला जास्त राखाडी केसांची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते रंगीत किंवा रंगवून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीचा रंग मिळेल.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)