उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?
पाणी प्यायल्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर, हेच पाणी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करत असतं.
दररोज शरीरात किमान 2 लीटर पाणी गेल्यास त्यामुळं किडनी सुरळीत काम करते. याशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं कामही पाणीच करतं.
इतकंच नव्हे, तर पुरेशा पाण्यामुळं शरीरातील नकारात्मक घटक लघुशंकेवाटे शरीराबाहेर टाकण्याचं काम नैसर्गिकरित्या होतं.
जाणकारांच्या मते दर दिवशी 7 ते 8 तास गरम पाणी प्यायल्यामुळं बद्धकोष्टतेची समस्या दूर होते. गरम पाण्यामुळं शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं.
गरम पाणी प्यायल्यामुळं येणारा घाम बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून शरीर थंड ठेवण्याचं काम करतो.
गरम पाणी प्यायल्यामुळं वजनही नियंत्रणात राहतं. याशिवाय शरीराची पचनशक्ती वाढते. याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवरही दिसून येतो.