संत्री,मोसंबी,द्राक्ष आणि लिंबु यांसारखी आंबट फळे खाल्यास डोकेदुखीचा त्रास होतो.
लोणच्यासारखे आम्लयुक्त पदार्थ खात असाल तर त्याचे जास्त सेवन करु नये.त्यामुळे डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.
दुधामध्ये लॅक्टीक अॅसिड असते. जर तुम्ही लॅक्टोज असहिष्णु असाल, तर दूध हे डोकेदुखीचे कारण बनु शकते.
चॉकलेटमध्ये टायरामाइन नावाचे एन्झाइम असते.त्यामुळे रक्तदाब वाढल्याने डोकं दुखते.
स्ट्राँग कॉफी प्यायल्याने सुद्धा डोकेदुखी होते.स्ट्राँग कॉफीमध्ये कॅफिनमुळे डोकेदुखी वाढते.
चीजमध्ये प्रामुख्याने टायरामाइन असते.त्यामुळे चीजचे सेवन केल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
दररोज 60 मिलिलिटरपेक्षा जास्त अल्कोहोल प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते.
काही लोकांना थंड पदार्थाचे सेवन सहन होत नाही. आइस्क्रीमसारख्या पदार्थाचे सेवन केल्याने मायग्रेनचा त्रास होतो.