कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरावर दुष्परिणाम? पाहा एका दिवसात नेमका किती कांदा खावा
कच्चा कांदा खाल्ल्यामुळं अनेकांना पचनासंबंधीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. कांद्यामध्ये असणाऱ्या फ्रुक्टेन नावाच्या कार्बोहायड्रेटमुळं ही समस्या सतावते.
कच्चा कांदा खाल्ल्यामुळं अनेकांना गॅस, सूज, पोटाचे विकार आणि पचनसंबंधी विकार जडू शकतात. अशा समस्या असणाऱ्यांनी कांदा कमीच खावा.
कच्चा कांदा खाल्ल्यामुळं तोंडाला भयंकर वास येतो. त्यामुळं एखाद्या ठिकाणी जाताना कच्च्या कांद्याचं सेवन टाळा.
काही मंडळींना कच्च्या कांद्याची अॅलर्जी असते. कांद्याच्या सेवनामुळं त्यांना शरीरावर खाज सुटमं, सूज येणं, श्वसनास त्रास होणं अशा अडचणी होतात. अशा व्यक्तींनी कांदा खाणं टाळावं.
काही व्यक्तींना कांद्याच्या अती सेवनामुळं छातीत जळजळ होते. कांद्यामध्ये असणाऱ्या एसोफॅगल स्फिंक्टरमुळं हा त्रास होतो. त्यामुळं हा त्रास असणाऱ्या मंडळींनी कांदा कमी खावा
मायग्रेन, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह अशा समस्या असणाऱ्यांच्याही अडचणी कांद्याच्या अतीसेवनामुळं वाढतात.
राहिला प्रश्न कांदा किती खावा? तर, एका दिवसात 1 ते 2 कांद्यांहून (भाज्या आणि उसळींमध्ये वापर) अधिक सेवन केल्यास ते शरीरावर दुष्परिणाम करु शकतं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आहाराच्या सवयींमध्ये बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )