लठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा

Jun 18,2024


उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात.

पोषक तत्त्वे

दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

दही प्रोबायोटिक असल्याने त्याचा पचनसंस्थेसाठी फायदा होतो. तर भाजलेले जिरं पोटदुखी, मळमळ, अपचन, जुलाब यांसारख्या समस्या दूर करते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती

दहीमध्ये असलेले प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच जिऱ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे आजारांपासून संरक्षण होते.

व्हिटॅमिन-ए

दहीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ए सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि तेलकटपणा कमी होतो. तसेच जिऱ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेचे विकार होत नाहीत.

रक्तप्रवाह

जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर जिरं उपयुक्त ठरते. तर दही शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. तसेच अतिरिक्त चरबी कमी होते.

मधुमेह

मधुमेहाच्या रूग्णांनी जिरं आणि दही एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story