हेल्दी लाईफस्टाईलसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे. योग्य आहार आणि भरपुर प्रमाणात योग्य घटकांचं सेवन केल्यास शरीर निरोगी रहातं
खुप लोकांच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. त्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होतो.
शरीरात कोलोजन नावाचं प्रोटीन आढळतं, ज्यामुळे चेहरा चमकदार आणि उजळलेला दिसतो. जेव्हा शरीरातील कोलोजन कमी होतं त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
स्नायू, केस, हाडं आणि रक्तपेशींमध्ये कोलोजन प्रोटीम भरपुर प्रमाणात आढळलं जातं, त्यामुळेचं केसांवर एक वेगळीचं चकाकी असते
वाढत्या वयासोबत लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, चेहऱ्यावरचं तेज सुद्धा कमी होतं. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही खुप गंभीर परिस्थिती असू शक्ते.
शरीरात कोलोजनची मात्रा वाढवण्यासाठी तुम्हाला भरपूर विटामिन सीचे सेवन करावे लागेल.
तुम्ही आहारात आंबट फळे जसे की लिंबू , संत्री, आवळा आणि द्राक्षांचा समावेश करावा.
या व्यतिरिक्त टोमॅटो, हिरव्या भाज्या, मासे, अंडी आणि डेअरी प्रोडक्टस यांचा डायटमध्ये समावेश केल्यास शरीराला मदत होते.