चुकूनही 'या' 5 पदार्थांचे सेवन करू नका,

लवकर येऊ शकते म्हातारपण…

तुमच्या आहारात चुकूनही 5 पदार्थांचे सेवन करू नका, नाही तर तुम्हाला वेळेआधी म्हातारपण येईल.

फ्रेंच फ्राय

आहारतज्ज्ञनुसार फ्रेंच फ्राय अतिशय घाताक आहे. हे पदार्थ त्वचेची लवचिकता कमी करतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

ब्रेड

बरेच लोकांना व्हाईट ब्रेड खाण्याची सवय असते. पण हा ब्रेड तुमच्यासाठी घातक आहे. यातील ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते. व्हाईट ब्रेड खाल्ल्याने शरीराला हानी तर होतेच पण त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळीही वाढते.

पांढरी साखर

साखर शरीरासाठी खूप हानिकारक असून याचं जास्त सेवनाने अनेक आजाराचा धोका वाढतो. साखर खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्सची समस्या वाढते. शिवाय त्वचाही खूप कोरडी पडते. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वाढते.

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस त्वचेसाठी हानिकारक आहे. यातील सोडियम, चरबी आणि सल्फाइट्सचे प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे त्वचेचे निर्जलीकरण होत आणि जळजळ होऊन कोलेजन कमकुवत होतात. याचे सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होते.

सोडा आणि कॉफी

सोडा आणि कॉफी दोन्ही शरीराला घातक आहे. दोन्हीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असतं. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि वृद्धत्वाची चिन्हे वाढतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story