मधामध्ये सुमारे 80% साखर असते. मात्र मॅग्नेशियम, तांबं आणि कॅल्शियम ही खनिजं देखील मधामध्ये आढळतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अत्यंत काळजी घ्यावी. अशावेळी मध खरेदी करण्यापूर्वी त्यात भेसळ नाही याची खात्री करून घ्या.
जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी किती मध खावं?
मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून 10-20 ग्रॅम मधाचं सेवन केलं पाहिजे.
कच्चा मध खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
मध शरीरातील जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय मधामुळे पचनक्रिया सुधारते.