आपल्यापैकी बहुतेकांना गोड पदार्थ आवडतात. सण किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी मिठाई घरी आणली जाते
चवीला जितकी गोड लागते तितकीच ती आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते.
गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटाचा घेर वाढू शकतो.
जास्त साखर मधुमेहाला निमंत्रण देतं.
खूप गोड खाल्ल्याने शरीराला सूज येऊ शकते असेही अनेक डॉक्टरांचं मत आहे.
आजारांपासून दूर राहण्यासाठी लोकांना गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.