कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं?

नेहा चौधरी
Jul 29,2024


वाईट जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झालीय.


खराब कोलेस्ट्रॉलमुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो आणि त्यातून हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याची भीती उद्भवते.


खराब कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करावा असं तज्ज्ञ सांगतात.


कांद्यामध्ये अनेक गुणधर्म असून ऑर्गेनिक सल्फर नावाचं पोषक तत्व असतं. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.


कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात जे पचनसंस्थेला योग्यरित्या कार्य करण्यास फायदेशीर ठरतं.


त्यामुळे आहारात कच्चा कांद्याचे सेवन करावे. त्याशिवाय तुम्ही कोशिंबीर करुनही कांदा खाऊ शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story