जनावरांना नाक आणि तोंडासंबंधी असणाऱ्या रोगांमुळे घोऱण्याचा आजार उद्भवतो असं डॉक्टर सांगतात. जनावरांच्या नाकात जंतूंनी प्रवेश केल्यामुळे होणाऱ्या रोगाचाही याच्याशी संबंध असतो.
पशुतज्ज्ञांच्या मते, जेव्हा जनावराला श्वास घेताना त्रास होतो तेव्हा घोरण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हाला जनावरांमध्ये अशी समस्या जाणवत असेल तर तात्काळ प्राण्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
अनेक जनावरांमध्ये चुकीच्या पद्धतीने झोपल्यास ही समस्या जाणवते.
जनावरांच्या घोरण्याच्या आजाराला स्नोअरिंग डिसीज असं म्हणतात.
गाई आणि म्हशीही माणसाप्रमाणे घोरतात हे तुम्हाला माहिती आहे का. पण जर जनावर असं घोरत असेल तर हे एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात.