रोज सकाळी 1 चमचा तिळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?

Sep 02,2024

पचनासाठी उपयुक्त

सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

तिळाच्या तेलामध्ये सेसमिन आणि सेसमॉल असतात. जे अँटिऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात.

वजन कमी होते

सकाळी उपाशीपोटी तिळाच्या तेलाचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. तिळात चांगल्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हाडे मजबूत होतात

हे तेल हाडांसाठी खुप उपयुक्त आहे. तीळात कॅल्शियम आणि डायटरी प्रोटीन असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याशिवाय हाडांचे दुखणे कमी होते आणि संधिवाताचा त्रासही दूर होतो.

रक्ताची कमतरता दूर होते

तीळात आयर्न असते, ज्याने रक्ताची कमतरता भरून निघते. ज्या लोकांना अॅनेमियाचा त्रास आहे त्यांनीही हे तेल सकाळी उपाशी पोटी प्यावे.

दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त

तिळात जास्त प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते. ज्याने दात चांगले राहतात. तीळात व्हिटॅमिन बी असल्याने दातात कीडही लागण्याची समस्या दूर होते.

अँटी एजिंग

तिळात अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. ते त्वचेवरील वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करते.

केसांसाठी उपयुक्त

तीळ खाल्याने फक्त शरीरालाच नाही तर केसांनाही फायदा होतो. तिळातील ओमेगा, फॅटी अॅसिड केसांना मजबूत आणि लांब बनवते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story