सकाळ संध्याकाळ जॉगिंग करणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. जॉगिंग केल्याने हाडे मजबूत होतात याशिवाय मांसपेशीही अधिक बळकट होतात.
स्क्वॅश जगातील सर्वात आरोग्यदायी खेळ म्हणून ओळखला जातो.स्क्वॅश हा एक रॅकेट खेळ आहे जो दोन खेळाडूंनी चार-भिंतीच्या कोर्टवर लहान, पोकळ रबर बॉलसह खेळला जातो.
पोहण्याच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होते.
बास्केटबॉल हा खेळ एका आयताकृती मैदानावर खेळला जातो. बास्केटबॉल हा खेळ हिवाळ्यात घरी राहून देखील खेळू शकता.
एक टेनिस सामना तीन किंवा पाच सेटचा बनलेला असतो, ज्यापैकी प्रत्येकामध्ये सहा गेम असतात. टेनिस खेळल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हा मैदानी खेळ खेळल्याने तुम्ही शारिरिकदृष्ट्या मजबुत रहाल.