जेवताना नाक अचानक गळू लागतं, या प्रक्रियेला गस्टेटरी रायनाईटीस असं म्हटलं जातं.
थोडक्यात जेवण चावत असताना, चघळताना ट्रायझेमिनल नर्व्ह अॅक्टीव्ह होते. यामुळं नाकातून पाणी वाहू लागतं.
शरीरातील पॅरासिम्पेथेटीक नर्व्ह सिस्टीमचं काम असतं, लाळ तयार करणं. ज्यामुळं नाकातील म्युकसमध्ये वाढ होते. काही मंडळींमध्ये शरीरातील ही यंत्रणा जास्त प्रमाणात सक्रिय असते.
तिखट आणि अती तिखट जेवण जेवताना शरीरातील ही प्रणाली सक्रिय होऊन नाक वाहू लागतं.
एखाद्या खाद्यपदार्थाची अॅलर्जी असल्यासही नाकातून पाणी वाहू लागतं. हा त्रास होत असल्यास मसालेदार अन्नपदार्थ टाळावेत.