रोज सकाळी ग्लासभर हळदीचं पाणी प्या; दिसतील 'हे' 7 चमत्कारिक फरक

हळदीच्या दूधाचे फायदे सर्वांना ठाऊक

हळद घातलेलं दूध पिण्याचे फायदे तुम्ही अनेकदा वाचले असतील. हळदीच्या दूधाचे फायदे सर्वांना ठाऊक असतात.

हळदीचं पाणी पिण्याचे फायदे

आज मात्र आपण पाण्यात हळद घालून सेवन केल्याने होणारे 7 फायदे जाणून घेणार आहोत.

पचनशक्ती सुधारण्यास मदत

हळद घातलेलं पाणी प्यायल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अन्नपचन सुरळीत होण्यास मदत होते.

सांधेदुखीपासूनही आराम

हळदीचं पाणी प्यायल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

तोडं आलं असेल तर फायदा

तोंड आलं असेल तर हळद घातलेलं पाणी पिणं फायद्याचं ठरतं. एक ग्लास पाण्यात 2 चमचे हळद टाकून ते उकळून घ्यावं.

गुळण्या करा...

उकळलेलं पाणी थंड करुन त्याने गुळण्या कराव्यात. असं केल्याने अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला तोंड आल्याने होणारी जळजळ थांबेल.

फॅट्स कमी करण्यासाठी मदत

शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी हळदीचं पाणी फायद्याचं ठरतं.

इंफ्लमेट्री गुणधर्म

हळदीच्या पाण्यात इंफ्लमेट्री गुणधर्म असतात. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.

रक्तासंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत

रक्त गोठण्याच्या किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्याही हळदीचं पाणी प्यायल्याने दूर होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदा

हळदीचं पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायद्याचं असतं.

महिलांना विशेष फायदा

महिलांमधील हार्मेन्स म्हणजेच संप्रेरकांचं प्रमाण स्थीर ठेवण्यासाठी हळदीचं पाणी फायद्याचं ठरतं.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story