मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे? याचे उत्तर असे आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत.
राजमाचा GI 30 पेक्षा कमी आहे. चांगली गोष्ट अशी आहे की राजमा हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत देखील आहे. याशिवाय लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन के आणि विद्राव्य तसेच न विरघळणारे फायबर देखील राजमामध्ये आढळतात.
सफेद छोले हे प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा GI कमी आहे. सफेद छोले हे हाडे, मेंदू आणि हृदयासाठी देखील चांगले आहेत. भाजी आणि सलाडच्या रुपात तुम्ही याचे सेवन करू शकता.
चेरी हे असेच एक फळ आहे ज्याचा GI स्कोर फक्त 20 आहे. चेरीमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्याच्या वापराने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
संत्री वजन कमी करण्यास मदत करू शकतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करू शकतात. शुगरच्या रुग्णांसाठी संत्री हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
सफरचंद हे देखील कमी GI असलेले फळ मानले जाते. सफरचंदांमध्ये फ्रक्टोज, पॉलिफेनॉल आणि अँथोसायनिन्स असतात. या सर्वांमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
चहा किंवा कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय बनते. मात्र जर तुम्हाला मधुमेह असेल तर दालचिनीचा चहा घ्या. दालचिनीमध्ये फार कमी कार्बोहायड्रेट असतात.
रताळे जरी गोड असले तरी हे मधुमेहींसाठी योग्य अन्न आहे. रताळ्यामध्ये फोटोकेमिकल बीटा-कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. त्यामुळे रताळे डोळे आणि त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर असते.
अंकुरलेले संपूर्ण धान्य फायदेशीर त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने कमी होते. एक कप अंकुरित धान्यामध्ये फक्त 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये 6 ग्रॅम डायटरी फायबर असते. हे फायबर पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियादेखील खूपच उपयुक्त असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये फारच कमी कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तुम्ही तुमच्या आहारात पालक, हिरव्या भाज्या, मुळा, गाजर, बकव्हीट, बार्ली यांसारख्या पदार्थांचा देखील समावेश करू शकता, कारण त्यांचा GI स्कोर देखील खूप कमी आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)