कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

कोणत्या वयात मधुमेहाचा धोका जास्त असतो?

45 वर्षांच्या वयानंतर टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. ही संख्या 18 ते 44 वयोगटातील लोकांपेक्षा सुमारे 5 पट जास्त आहे. वयानुसार मधुमेहाचा धोका वाढतो.

लहान मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे

उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त वजन, वारंवार भूक लागणे, थकवा जाणवणे अशा समस्या असल्यास लगेच मधुमेहाची तपासणी करून घ्यावी.

लहान वयातच एखाद्या मुलास मधुमेह झाला तर पुढे इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो.

वय आणि मधुमेहाचा संबध

30-40 वयोगटातील व्यक्ती या त्यांच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देतात.

आयुष्याची मजा लुटण्यासाठी पार्टी, उशिरा झोपणं, चुकीचा आहार आणि धुम्रपान अशा गोष्टींच्या आहारी जातात.

तर काहीजण भविष्याची तरतूद आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिवसरात्र कामात व्यग्र राहणं अशा गोष्टींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

जास्त ताण आणि चुकीची जीवनशैली यामुळे स्वादुपिंडातील हेल्दी म्हणजेच निरोगी पेशी मरू लागतात म्हणजेच कमी होवू लागतात.

VIEW ALL

Read Next Story