धण्याचे पाणी आतड्यांमध्ये चिटकलेली खाण स्वच्छ करते, महिनाभर प्या आणि स्वतः बघा फरक
रात्री एक ग्लास पाण्यात धणे भिजवून तुम्ही चे पाणी सकाळी पिऊ शकतात.
भारतीय स्वयंपाक घरात धण्याचा वापर मसाल्याच्या स्वरूपात केला जातो. याने फक्त जेवणाची चव वाढत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर होतो.
धण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन यासारखे पोषक तत्वे असतात. ज्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो.
धण्यामध्ये टेरापिन, क्वेरसेटिन आणि टोकोफेरोल सारखे अॅंटिऑक्सिडंट घटक सापडतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
धण्याचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहते. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी हे खूप फायदेशीर आहे.
धण्याचे पाणी पायल्यास किडनी डिटॉक्सिफाय होते. जे आरोग्यासाठी चांगले आहे.
धण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नीशियम सारखे पोषक घटक आहेत. हे हाडांसाठी उपयुक्त असतात.
धण्यात अॅंटिऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदयाच्या संबंधीत आजार होण्याची शक्यता कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)