फक्त भारतातच या अत्यंत दुर्मिळ अशा नैसर्गिक औषधी जडीबुटी आढळतात.
ही दुर्मिळ जडीबुटी हिमालयीन व्हायग्रा (Himalayan Viagra) किंवा यारसागुंबा (Yarsagumba) नावाने ओळखली जाते.
ही वनस्पती म्हणजे एक बुरशी आहे जी पर्वतांमध्ये 3500 मीटर उंचीवर आढळते.
या जडीबुटीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया एका कीटकाद्वारे होते. यामुळेच ही अत्यंत दुर्मिळ जडीबुटी आहे.
या जडीबुटीमध्ये प्रोटीन्स, पेप्टाइड्स, अमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन बी-1, बी-2 आणि बी-12 सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला ताकद देतात.
यामुळे किडनी, फुफ्फुसे बळकट होतात. शुक्राणु वाढवण्यास मदत होते. ही जडीबुटी शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.
अनेक प्रकारच्या औषध निर्मीतीसाठी चीनला या जडीबुटीची गरज आहे.