तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाहीत ना ? 'या' लक्षणांमधून जाणून घ्या

शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं असतं.

आजकालच्या स्पर्धेच्या युगात लहान मुलं देखील डिप्रेशनमध्ये जात आहेत.

सध्याच्या काळात लहान मुलांना आईवडिलांचा सहवास फार मिळत नाही.त्यामुळे मुलं घरात बराच वेळ एकटी असतात.

मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही लक्षणांवरुन तुमची मुलं डिप्रेशनमध्ये आहेत का हे ओळखू शकता.

जर तुमची मुलं लहान लहान गोष्टींवरुन चिडचिड करत असतील तर हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं.

मुलं सतत स्वत:शीच बडबड करत असतील किंवा साध्या कारणावरुन वस्तू फेकत असतील, तर त्यांच्या मनात कसला तरी राग आहे हे समजावं.

एखादी गोष्ट खूप खोलवर मनाला लागली की, त्याचा परिणाम शरीरावर देखील होतो.

रात्रीची झोप न लागणं, वेळेवर न जेवणं ही सगळी लक्षणं डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

जर तुमची अचानक शांत शांत रहायला लागली, मित्र मैत्रिणींमध्ये मिसळत नसतील तर त्यांना कसला मानसिक त्रास तर नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं.

VIEW ALL

Read Next Story