दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये आहेत. ईडी त्यांची चौकशी करत आहे. अशातच ईडीने न्यायालयात गंभीर आरोप केलाय.
टाइप-2 मधुमेहाने ग्रस्त असूनही अरविंद केजरीवाल दररोज आंबे खात आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय अडचण सांगून सुटका करुन घेयची आहे, असा दावा ईडीने केलाय.
ईडीने केलेल्या या दाव्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र, खरंच आंबा खालल्याने डायबिटीज वाढतो का? यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय.
आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी इतर प्रकारच्या साखरेपेक्षा किंचित कमी होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.
आंबा गोड असतो आणि तरीही त्यात भरपूर कर्बोदके असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, असं पुण्यातील डॉक्टर गजानन शिंदे यांनी सांगितलं आहे.
मात्र, मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात, परंतु मर्यादित प्रमाणात... त्याचबरोबर जर एखाद्याची साखरेची पातळी नेहमीच जास्त असेल तर त्यांनी आंबा खाणं टाळावं.
आंब्याचे योग्य प्रमाण रुग्णाचं मधुमेह नियंत्रण ठेवते. तुमच्या औषधांच्या प्रमाणावर देखील तुमचं गोड खाण्याचं प्रमाण अवलंबून असतं, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.