बटाटा वडा, वडा पावमध्ये किती कॅलरी असतात?

वडापाव

पावसाळा सुरु झाला की वडापाव, गरमागरम बटाटावडा खाण्याचीच अनेकांची इच्छा होते. वडा तोच असतो, पण पावसाळी वातावरणानं त्याची चव आणखी वाढवलेली असते.

गरमागरम वडा

काही मंडळी या इच्छेखातर लगेचच आवडीच्या ठिकाणी जाऊन कढईतून काढलेला वडा खात आपली भूक भागवतात.

खवय्येगिरी

या खवय्येगिरीमध्ये थोडं आरोग्याकडेही लक्ष असूद्या. कारण, एका बटाटावड्यामध्ये किती कॅलरी असतात तुम्हाला माहितीये?

कॅलरी

तळलेल्या एका बटाटा वड्यामध्ये 156 कॅलरी असतात. साधारण 15 ते 16 ग्रॅम कार्ब्स आणि 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन असतं.

वडा पाव

बटाटा वडा पाव खात असाल, तर त्यामध्ये (1 नग) 304 कॅलरी असतात. वड्याच्या आकारानुसारही या कॅलरीचं प्रमाण वरखाली होतं.

घातक नाही, पण...

बटाटावडा आरोग्यास घातक नसला तरीही, वडापाव किंवा हा वडा प्रमाणाहून जास्त खाल्ल्यास मात्र त्यामुळं त्रास होण्याची अधिक शक्यता असते.

काळजी घ्या.

तेव्हा वडापाव आणि बटाटावड्यावर ताव मारताना कॅलरीचा विसर पडू देऊ नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story