हाडं मजबुत करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश..

आपल्या शरीरातील हाडे मजबूत असणं फार गरजेचे आहे.

हाडे मजबूत नसल्यास त्याचा त्रास म्हातारपणी जास्त जाणवतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण हाडांच्या मजबुतीची काळजी घेणं गरजेचं आहे.

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची सर्वांत अधिक गरज असते.

हाडांचा कमकुवतपणा जाणवत असेल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करु शकता.

पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. भाज्या हाडांसाठी फायदेशीर असल्यानं यातून हाडांना भरपूर कॅल्शियम मिळू शकते.

डाळी, बीया यांमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतं म्हणूनच आहारात डाळी, भाज्यांचा समावेश करायाल हवा.

सोयबीनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे मांसपेशी मजबूत होतात.आणि हाडं चांगली राहतात.

ड्रायफ्रुट्स मध्ये हेल्दी फॅट्स असतात. यातून मॅग्नेशिय, मँगनीज आणि व्हिटीमीन ई मिळते.

दह्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडांसाठी दही हे उत्तम आहे.

VIEW ALL

Read Next Story