मानसिक आरोग्य

असं म्हणतात की झोपण्यापूर्वी काळीमिरी खाल्ल्यास त्यामुळं मानसिक आरोग्य संतुलित राहतं. त्यामुळं हा उपाय करून पाहण्यास हरकत नाही. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

अपचनाचा त्रास

अपचनाचा त्रास होत असल्यास काळीमिरी खावी. यामुळं पोटाचे विकार, अपचन आणि शरीरातील वाईट घटकांचा नायनाट होतो. शिवाय शरीरारील अतिरिक्त चरबीही वितळते.

हाडांचे विकार

हाडांचे विकार असणाऱ्या मंडळींनी त्यांच्या आहाराहत कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थांसोबतच काळीमिरीयुक्त पदार्थांचाही समावेश करावा. यामुळं हाडं आणखी बळकट होतात.

मासिक पाळी

उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास मासिक पाळी नियमीत येण्यास मदत होते. अनेकदा काळीमिरी दुधात मिसळून खाल्ल्यासही मासिक पाळी वेळेवर आणण्यास मदत होते.

वातविकार

ज्यांना वातविकार आहेत त्यांनी तर काळीमिरी नक्कीच खावी. वात दोष दूर करण्यात काळीमिरी मदत करते. त्यामुळं आहारात तिचा समावेश नक्की करा.

सर्दी- पडसं

सर्दी- पडसं झालं असल्यास तुम्ही ही काळीमिरी खाऊ शकता. किंवा गरम पाण्यात टाकून तिचा वाफारा घेऊ शकता. यामुळं सर्दी दूर होण्यास मदत होते.

स्थुलता

स्थुलतेची समस्या असणाऱ्या मंडळींसाठीसुद्धा काळीमिरी फायद्याची. त्यामुळं त्यांनी जेवणात तिचा समावेश नक्की करावा. हो, पण इथं तिचं अतीप्रमाणात सेवन होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.

हार्मोन्सचं संतुलन राखणं

काळीमिरी खाल्ल्यानं शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं सोपं होतं. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी तर काळीमिरी नक्की खावी. त्यांच्यासाठी ती वरदानच.

इवलिशी काळीमिरी

तळहातावर ठेवली तर, अगदी लहान मोत्यासारखी वाटणारी ही काळीमिरी किती फायद्याची आहे, तुम्हाला कल्पना तरी आहे का?

काळीमिरी

आरोग्यासाठी इवलिशी काळीमिरी म्हणजे वरदान, उपाशीपोटी खाल्ल्यास होणार आश्चर्यकारक फायदे

VIEW ALL

Read Next Story