थंडीत भरपूर खजूर खा, शरिराला मिळेल ताकद; फायदे इतके की जाणून आश्चर्य वाटेल

डॉक्टरही देतात खजूर खाण्याचा सल्ला

खजूर हे पोषकतत्वांचा खजिनाच आहे. इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत हे स्वस्त असतं आणि गुणही फार असतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ खजूला डाएटमध्ये सहभागी करुन घेण्याचा सल्ला देतात.

आजारांपासून बचाव

थंडीत खजूर खाल्ल्याने दुप्पट लाभ मिळतात. खजूर फक्त शरिराला ऊर्जा देण्यात मदत करत नाही, तर अनेक आजारांपासून दूर ठेवतं.

खजूर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत हे जाणून घ्या

हायड्रेट

थंडीत आपलं वॉटर इनटेक कमी होतं. खजुरात पाणी असतं, त्यामुळे ते थंडीतही शरिराला हायड्रेट ठेवतं.

प्रतिकारशक्ती

खजूरमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे थंडीत होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.

कोलेस्ट्रॉल

खजूर शरिरातील खराब कोलेस्ट्रॉलही बाहेर काढतं, ज्यामुळे तुमचं ह्रदय निरोगी राहतं.

गोड खाण्यासाठी पर्याय

थंडीत आपल्याला गोड खाण्याची फार इच्छा होते. अशावेळी खजूर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असतो.

वजनावर नियंत्रण

गोड पदार्थ खाल्ल्यास वजन वाढतं. खजूर खाल्ल्यास तुमची गोड खाण्याची इच्छाच पूर्ण होणार नाही तर वजनही नियंत्रणात राहतं.

त्वचेचं रक्षण

खजूरमधील विटॅमिन्स थंडीत तुमच्या त्वचेचं रक्षण करतात आणि त्याला पोषणतत्वं देतात.

ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. कोणतेही उपचार, औषध, डाएट फॉलो करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story