तुम्हालाही चष्मापासून सुटका हवीय का? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय

वाढत्या प्रदुषणामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. त्यामुळे चष्मा लागू नये किंवा चष्याचा नंबर घालवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक उपाय करावेत ते जाणून घ्या..

त्राटक साधना

नजरदोष किंवा चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी त्राटक साधना केली जाते. एखाद्या बिंदूला लक्षकेंद्रीत करुन 10 ते 15 मिनिटे साधना केल्याने डोळ्यांची कार्यक्षमता वाढते.

नेत्र धौति

आयुर्वेदानुसार डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नेत्र धौति फायदेशीर ठरते. यासाठी पाण्याने डोळे स्वच्छ धुतले जाते. त्यामुळे डोळ्यांमधील घाण साफ होते. असे केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

नेत्रतर्पण

डोळे कोरडे पडल्यास नेत्रतर्पण केले जाते. डोळ्यांची उघडझाप करता येईल अशा पद्धतीने तुपाच्या सहाय्याने डोळ्यांवर आयुर्वेदिक उपचार करा.

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून डोळे स्वच्छ केल्याने डोळ्यांची नजर सुधारते.

आहारात आवळा,सुका मेवा, व्हिटॅमिन सी यांचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

सर्वांगासन हा व्यायाम केल्याने डोळे आणि मेंदुला रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठल्यावर प्या. असे केल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

VIEW ALL

Read Next Story