आयुर्वेदात शिसवाच्या झाडाला फार महत्त्व आहे. शिसव चे इंग्रजी नाव इंडियन रोजवुड आहे.
शिसवाची पाने, साल, आणि लाकूड सर्वत्रच वापरले जाते. अनेक वर्षांपासून विविध कामांसाठी या झाडाचा वापर केला जात आहे.
शिसवाच्या लाकडाचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत मात्र शिसवाच्या पानाचे आयुर्वेदिक फायदे फार लोकांना ज्ञात नाहीत. या पानांचे महत्त्व जाणून घेऊया.
शिसवाची पाने रक्तातील मधूमेह आटोक्यात ठेवण्यास मदत करतात.
आजकाल डॅन्डरफचा त्रास फार वाढला आहे. केसांवर शिसवाच्या पानांचा रस लावल्यास डॅन्डरफ कमी होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
शिसवाची पाने सौंदर्यपिटीका चेहऱ्यावरुन गायब करण्यास मदत करतात.
शिसवाच्या पानांत एंटीइंफ्लेमेटरी आणि एंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे घटक त्त्वचेसाठी फार फायदेशीर असतात.
हा पाला जर जखमेवर चोळला तर जखम लवकर भरते.
दाताच्या दुखण्यावर ही पाने गुणकारी आहेत. शिसवाचे पान चावल्याने दात दुखायचे थांबतात.
या पानांचे सरबत बनवून प्यायल्याने पित्त आटोक्यात राहते. सततची जळजळ बंद होते.