किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लंच पॅकिंग असो किंवा मुलांसाठी टिफिन असो, ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास करण्यात येतो.
अगदी रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थदेखील ॲल्युमिनियम फॉइलमध्ये देण्यात येतात. पण Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
आरोग्यतज्ज्ञांनुसार Aluminium Foil मधील पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
गरम पदार्थ आपण जेव्हा Aluminium Foil गुंडाळतो असे पदार्थांचं सेवन केल्यास अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्याची भीती वाढते.
गरम पदार्थ Aluminium Foil गुंडाळल्यामुळे त्यातील कण आपल्या अन्नात उतरतात.
फक्त सँडविच ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळल्यास हरकत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)