निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. डॅाक्टर पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात, त्यातील एक म्हणजे कंटोळी.
आयुर्वेदात कंटोळी हे अतिशय आरोग्यदायी मानले गेले आहे. कंटोळीला 'ककोरा' असंही म्हणतात आणि ही भाजी अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करते.
कारल्यासारखे दिसणारे कंटोळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
कंटोळीमध्ये अँटी-ॲलर्जीन गुणधर्म असल्याने आजार दूर होण्यास मदत मिळते.
तज्ज्ञांच्या मते, कंटोळीमध्ये आढळणारे ल्युटीन तत्व कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण देते.
कंटोळीमध्ये अँथोसायनिन असल्याने रक्तातील साखर कमी होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर असते.
कंटोळी भाजीमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी कमी करून वजन कमी करण्यास मदत होते.
कंटोळीमध्ये फायबर असते, त्यामुळे हे खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता, गॅस्ट्रिक अल्सर यासारख्या समस्या दूर होतात.
फायटोन्यूट्रिएंट्स असलेले कंटोळी शरीरातील सुस्ती दूर करून ऊर्जा टिकून ठेवते.