जीभ पोळण्याची कारणे

अनेकदा गरम चहा-कॉफी अगदी सूप प्यायल्यामुळे जीभ भाजते. एवढंच नव्हे तर लक्ष नसताना गरम पदार्थ खाल्ला किंवा जीभेवर ठेवला तरीही जीभ भाजते.

घरगुती उपाय फायदेशीर

कोणत्याही आजारावर घरगुती उपाय कायमच फायदेशीर ठरतात. याकरिता जीभ भाजण्यावर देखील पुढील उपाय करा.

थंड पाणी प्या

जीभ भाजल्यावर पहिल्यांदा लगेचच थंड पाणी प्या अगदी फ्रिजमध्ये ज्यूस असल्यावर ते घेतलात तरी चालेल. जळजळ शांत होते

दही-दूध घ्या

जीभ पोळल्यावर दही-दूध घ्या कारण यामुळे लगेच आराम मिळतो. दही-दूधात प्री-बायोटिक्स असल्यामुळे जीभेला आराम मिळतो.

मीठ-पाण्याच्या गुळण्या

मिठातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जखम बरी करते त्यामुळे पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यावर सूज कमी होते.

साखर किंवा मध

जीभेवर साखर किंवा मध लावल्याने थंडावा आणि आराम मिळतो.

VIEW ALL

Read Next Story