हाडांची बळकटी

दुधात कॅल्शिअमचं सर्वाधिक प्रमाण असतं. तसंच यामध्ये विटॅमिन डी असल्याने ते कॅल्शिअम हाडांमध्ये शोषण्यास मदत करतं. चेडर, स्विस आणि परमेसन चीजही हे कॅल्शिअमचे चांगले स्त्रोत आहेत.

दही

दह्यात फक्त कॅल्शिअम नव्हे तर, प्रोबायोटिक्स देखील असतात. जे हाडांसोबत आतड्यांचं आरोग्यही जपतात.

तार्ली मासे

या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतं. हे मासे काटेरी असले तरीही त्या लवचिक काट्यांमध्येच कॅल्शिअम अधिक प्रमाणात असतं.

टोफू

सोयामिल्क पासून बनलेला पदार्थ म्हणजेच टोफूसुद्धा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. याचा सामावेश बऱ्याचं अन्नपदार्थांमध्ये करता येतो.

बदाम

बदामात केवळ हेल्थी फॅट आणि प्रोटीन्स नसून त्यात, मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम सुद्धा असतं.

हिरव्या पालेभाज्या

पालक, ब्रॉकोली आणि मेथी अशा बऱ्याच हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअमचं अधिक प्रमाण असतं. फॉर्टिफाइड धान्यांमध्येही योग्य प्रमाणात कॅल्शिअम असतं.

रावस मासा

रावस माशामध्ये प्रोटीन्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असून यात बऱ्यापैकी कॅल्शिअम असतं.

अंजीर

सुकवलेल्या अंजीरमध्ये कॅल्शिअमचं चांगलं प्रमाण असून तो एक पौष्टिक नाश्ता आहे.

VIEW ALL

Read Next Story