अदा शर्माने नाव का बदललं?

तिचं खरं नाव काय? जाणून घ्या


'द केरला स्टारा मुळे लोकप्रिय झालेली अदा शर्मा सध्या भलतीच खूश आहे आणि याचं कारणही तितकंच खास आहे.


'द केरला स्टोरी' ने ही अभिनेत्री आघाडीच्या तारकांमध्ये समाविष्ट झाली असून वादाच्या भोवऱ्यात असूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.


या चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून आता २०० कोटींच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झाला आहे.


याच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अदाने आपल्याला खरे नाव बदलावं लागलं असल्याचा खुलासा केला.


आपलं मूळ नाव अदा नव्हे तर चामुंडेश्वरी अय्यर होतं. नंतर ते बदलून अदा शर्मा असं केलं, असं ती यावेळी म्हणाली.


खरं नाव उच्चारणं कठीण होतं. अनेक जण त्याचा उच्चारही नीट करत नव्हते. यामुळे मला हा बदल करावा लागला, असे अदा पुढे म्हणाली.


अदा शर्माने २००८ मध्ये प्रदर्शित '१९२०' या हॉरर- थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयातील कारकीर्द सुरू केली. रजनीश दुग्गलसह केलेला हा चित्रपट हिट ठरला.


पण, त्यानंतर तिला फारसे काम मिळू शकले नाही. आता मात्र 'द केरला स्टोरी'ने तिचे नशीब पालटले आहे. या चित्रपटाने तिला ओळख तर प्राप्त करून दिलीच.


शिवाय, इंडस्ट्रीत स्थानदेखील मिळवून दिलं आहे. सोशल मीडियावर विशेष अॅक्टिव्ह असणाऱ्या अदाचे फॅन फॉलोईंग देखील उत्तम राहिले आहे.

VIEW ALL

Read Next Story