मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सध्या बिगबॉस मराठी 5 च्या घरातील तिच्या वागणुकीमुळे चर्चेत आहे. आधी वर्षा उसगांवकर आणि आता पॅडी कांबळे अशा सिनियर मंडळींना अपमानित केल्याने जान्हवीवर टीकेची झोड उठली आहे.
अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा तिच्यावर टीका केली असून जान्हवीचा बचाव करताना तिचा पती किरण किल्लेकर याने सोशल मीडियावर पोस्ट केली.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या लग्नाला 10 ते 12 वर्ष झाले असून तिला ईशान नावाचा मुलगा सुद्धा आहे.
जान्हवी किल्लेकर आणि तिचा पती किरण किल्लेकर यांचे लव्ह मॅरेज असून त्यांची ओळख डान्स क्लासच्या निमित्ताने झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार जान्हवीचा नवरा किरण किल्लेकर हा व्यावसायिक असून 'किरण किल्लेकर एंटरटेन्मेंट अँड प्रोडक्शन हाऊस' या नावाने त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे.
जान्हवीच्या म्हणण्यानुसार किरण किल्लेकर याला अधिकतर लॅमलाईट पासून दूर राहायला आवडते. त्यामुळेच ती त्याच्या सोबतचे जास्त फोटो सोशल मीडियावर टाकत नाही.
जान्हवी किल्लेकर हिला 'भाग्य दिले तू मला' आणि 'श्री स्वामी समर्थ' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.
जान्हवी ही मूळची अलिबागची असून तिने एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे तिचे लग्नापूर्वीचे नाव हे भावना गायकवाड असे होते.