जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसैन यांचे सोमवारी निधन झाले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73 वर्षी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आता झाकीर हुसैन हे मृत्यूनंतर किती संपत्ती मागे ठेऊन गेले आहेत यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.
झाकीर हुसैन एका कार्यक्रमासाठी 5 लाख रुपये ते 10 लाखांदरम्यान मानधान आकारायचे.
झाकीर हुसैन हे अनेक कॉन्सर्ट, कोलॅब्रेशन्स आणि रेकॉर्डिंगससाठीही काम करायचे.
समोर आलेल्या माहितीनुसार, झाकीर हुसैन यांनी त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी 5 रुपये इतकं मानधन घेतलं होतं.
झाकीर हुसैन यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या नावावर 1 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 8 कोटी 50 लाख रुपये इतकी संपत्ती होती.