'शोले' चित्रपटासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांचं मानधन किती?
तब्बल 48 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 ला चित्रपटगृहात शोले रिलीज झाला होता. देशातील 100 हून अधिक चित्रपटगृहात सर्वाधिक काळ 25 आठवडे हा प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता.
3 कोटीच्या या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला जातो.
धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी आणि अमजदखान यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
पण या चित्रपटासाठी धर्मेंद्र, अमिताभ आणि जया बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीय का?
वीरू या भूमिकेसाठी धर्मेंद्र यांना 1 लाख 50 हजार मानधन देण्यात आलं होतं.
संजीव कुमार यांना 1 लाख 25 लाख मानधन देण्यात आले.
अमिताभ यांना 1 लाख मानधन मिळालं होतं.
बसंती म्हणजे हेमा मालिनीला 75 हजार रुपये देण्यात आले.
गब्बर सिंगला 50 हजार रुपये मिळाले
तर जया भादुरी बच्चन यांना सर्वात कमी 35 हजार मिळाले होते.