फायर ( Fire)

नंदिता दास आणि शबाना आझमींची मुख्य भूमिका असलेला फायर चित्रपट भारतात बॅन झाला होता. लग्न झाल्यानंतरही नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम नसणाऱ्या दोन स्त्रियांची कथा या सिनेमात दाखवली आहे.

Nov 08,2023

वॉटर ( Water)

दीपा मेहता दिग्दर्शित वॉटर हा चित्रपट आठ वर्षांपासून विधवा असणाऱ्या स्त्रिवर आधारित आहे. तिला आयुष्यभरासाठी वाराणसी येथील एका आश्रमात राहायला पाठवले जाते. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि लिसा रे मुख्य भूमिकेत दिसतात.

सिन्स ( Sins)

ख्रिश्चन धर्मगुरू जेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने लहान मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर पुढे काय होते यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. शायनी आहुजा आणि सीमा रहमानी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

बॅन्डीट क्वीन ( Bandit Queen )

फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट भारतात बॅन झाला होता. नंतर, बॅन उठल्यानंतर आता हा चित्रपट Youtube वर उपलब्ध आहे.

URF प्रोफेसर ( URF Professor )

चित्रपटातील बोल्ड सिन्स मुळे हा चित्रपट बॅन करण्यात आला होता.

पांच ( Paanch)

CBFC नं काही कट्सची मागणी केल्यानंतरही हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला नव्हता. शिवीगाळ, सेक्स आणि ड्रग्स सेवन दाखवल्याने हा चित्रपट बॅन करण्यात आला होता.

अनफ्रीडम ( Unfreedom)

समलैंगिकतेवर आधारित असणारा हा चित्रपट भारतात बॅन असला तरीही Youtube वर तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

द पेंटेड हाऊस ( The Painted House)

वयाने जेष्ठ व्यक्ति जेव्हा त्याच्याहून वयाने लहान मुलीच्या प्रेमात पडतो यावर हा चित्रपट आधारित आहे.

ब्लॅक फ्रायडे ( Black Friday)

1993 च्या बॉम्ब स्फोटावर आधारित असणारा हा चित्रपट भारतात बॅन झाला होता. पण, 2006 साली हा बॅन उठवण्यात आला.

इनशाअल्लाह (Inshaallah)

फुटबॉल खेळण्याची इच्छा असणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला विदेशात जाण्याची परवानगी नाकारली गेल्यावर पुढे काय होते त्यावरील ही डॉक्युमेंटरी आहे.

VIEW ALL

Read Next Story