विकी कौशल आणि कतरिना कैफची चर्चा

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफची.

Sep 30,2023

कपल गोल्स

त्या दोघांचे कपल गोल्स पाहून समस्त जोडपी त्यांना फॉलो करतात.

समस्त जोडप्यांसाठी धडा

परंतु सध्या विकीनं कतरिनाबद्दल जे काही सांगितलं आहे ते वाचून तुम्हीही त्यातून धडा घ्याल.

कतरिना कैफसोबतच्या नात्यावर

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीतून विकी कौशलनं त्याच्या आणि कतरिना कैफच्या नात्यावर भाष्य केले आहे.

आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा...

तो म्हणाला की, ''आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा आम्ही आरामात असतो. आम्ही काही बाहेर कामासाठी जात नाही. तेव्हा आम्ही प्रचंड आळशी असतो. हा क्षण आमच्यासाठी खूप छान असतो.''

दोन आळशी लोकांसाठी...

''आमच्यासाठी म्हणजे आम्हा दोन आळशी लोकांसाठी ही एक मस्त पार्टी असते. परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र कतरिना खूप कडक आहे. ती राक्षसासारखी असते.''

कतरिना आणि विकीच्या नात्याचा अंदाज

यावरून आपल्याला कतरिना आणि विकीच्या नात्याचा अंदाज बांधता येईल. त्या दोघांचे नाते हे फारच गोड आहे.

लग्नाला दोन वर्षे पुर्ण होणार

सध्या विकीच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पुर्ण होणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story