लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला, विनोदी भूमिका सादर करताना आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मागील अनेक दशकांपासून मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरचे अनेक चित्रपट गाजवले.
मात्र आपल्या भूमिकांबरोबरच अशोक सराफ यांची शर्टाची वरची 2 बटणं उघडी ठेवण्याची स्टाइलही 1990 च्या दशकामध्ये चांगलीच गाजली.
अशोक सराफ यांचा हा लूक ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून दिसून आलेला.
पण अशोक सराफ हे शर्टाची वरची 2 बटणं उघडी का ठेवायचे? यासंदर्भातील रंजक कारण त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. 2 बटणं तुम्ही उघडी का ठेवायचे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला.
पूर्वीच्या काळी बटण असणारी शर्टच अधिक वापरली जायची. कॉलरपर्यंत बटणं पुर्ण लावल्यावर फार उकडायचे आणि त्यामुळे अशोक सराफ मुद्दाम वरची दोन बटणं उघडी ठेवायचे.
"शर्टाचे पहिले बटण बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी उघडं ठेवायचो," असं मजेदार उत्तर अशोक सराफ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिलं होतं.
"काही वर्षे मी स्टाइल म्हणून शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवली होती आणि त्यावेळी ती स्टाइल देखील होती," असे मजेशीर उत्तर अशोक सराफ यांनी दिलं होतं.